उदगीरमध्ये जिल्हापरिषद कर्मचऱ्यांचा एक दिवसाचा लक्षणिक संप

उदगीर/ प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने. मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला, सदर मागण्याचे निवेदन सहायक गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्यशासनाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एकुण २३ मागण्यासंदर्भात वेळोवेळी युनियन च्या वतीने अनेक वेळा चर्चा तसेच निवेदने देऊन सुद्धा, शासनाने कुठलेच ठोस निर्णय न घेतल्याने उदगीर पंचायत समितीच्या वर्ग ३ व वर्ग ४ चे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या. एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत शासनाचा निषेध नोंदवला. युनियन च्या वतीने सहायक गट विकास अधिकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युनियन चे अध्यक्ष धनराज बिरादार, सचिव देवर्षे एम. एस., आजने व्ही. व्ही., अरुण बिरादार सर्व पदाधिकरी व अन्य महिला कर्मचारी उपस्थित होते.

१० हजार ७०० कोटींची तरतूद तरीही आयोगाला उशीर का ? सरकारी कर्मचारी