बसपास दरवाढ विरोधात 15 हजार पुणेकरांच्या स्वाक्षऱ्या

PMPML

पुणे : पीएमपीएमएलने केलेल्या दरवाढीच्या विरोधात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेची सांगता तीन डिसेंबरला होणार आहे. या स्वाक्षरी मोहिमेत जवळपास 15 हजार नागरिकांनी स्वाक्षरी करत आपला सहभाग नोंदवला आहे.पीएमपी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामान्‍य नागरिकांसाथीच्या पासदरात काही महिन्यापुर्वी अचानक वाढ केली. या दरवाढीचा फटका पीएमपीने नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या दरवढीला पुणेकरांनी विरोध केला पण दरवाढ मागे घेण्यात आली नाही. यामुळे पुण्यातील विविध सामाजिक संस्थानी एकत्र येऊन पुण्यातील विविध भागात स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे ठरविले. या नुसार निषेध आणि विरोध दर्शवण्यासाठी “प्रवासी मंच’ आणि पुणे-पिंपरी चिंचवड येथील 11 सहभागी संस्थांनी एक महिना ही मोहीम राबवली होती. आयएमडीआर सभागृहागृहात तीन डिसेंबर रोजी संध्यकाळी पाच वाजता या स्वाक्षरी मोहिमेचा सांगता समारंभ होणार आहे.

1 Comment

Click here to post a comment
Loading...