सिग्नल, वाहतूक नियोजन नाही, पण भर पावसात उचलली जातात वाहने!

traffic police crane

सोलापूर : सात रस्ता परिसरातील गरूड बंगला चौक. रात्री साडेसात-पावणेअाठची वेळ. जोरात पाऊस सुरू असल्याने काही नागरिक रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून अाडोशाला थांबले आहेत. वाहतूक विभागाची क्रेन येते अन् वाहने उचलून नेते.

पाऊस पडतोय. काही महिलांसोबत लहान मुुले अाहेत. ज्येष्ठ नागरिक अाहेत. पावसामुळे गाडी लावली अाहे, याचेही भानही क्रेनवरील पोलिस आणि कामगारांना नसल्याचे दिसून आले. परजिल्ह्यातील वाहने अडवून दंडात्मक कारवाई करणे अाणि क्रेनद्वारे विशिष्ट ठिकाणाहून वाहने उचलणे हाच परिपाठ सुरू अाहे.

Loading...

दुसरीकडे अनेक चौकातील सिग्नल बंद अाहेत. मुख्य चौकात, रिक्षातून अोव्हरसीट प्रवासी, ट्रीपल सीट दुचाकीस्वार जातात. अनेक बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी आहे. याकडे मात्र वाहतूक पोलिसांचे लक्ष नाही. रविवारीही दुपारी पाऊस पडत होता, पावसात पार्क चौक, स्टेशन, बसस्थानक अादी विशेष भागातच कारवाई सुरूच होती.

अलीकडील काळात तर शासकीय रुग्णालयाच्या अावारातील वाहने उचलून नेण्यात येत अाहेत. याबाबत पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांना विचारले असता, ही कारवाई चुकीची अाहे. नेमकी माहिती घेऊन सूचना देतो. सिग्नल बंद अाहेत. महापालिका वेळेवर दुरूस्त करून देत नाही. कारवाई समान पद्धतीने झालीच पाहिजे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट