सिद्धूची पाकिस्तानातील नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस

उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : ज्या लष्करप्रमुखांच्या प्रेरणेने कश्मीरात सीमेवर हिंसाचार सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत मेजर कौस्तुभ राणेसह पंधरा जवान पाकड्यांशी लढताना शहीद झाले, पण नवज्योत मात्र पाकिस्तानात जाऊन नाचेगिरी करतो हा निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणत सामना संपादकीयमधून पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा समाचार घेण्यात आला आहे.

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला नवज्योत सिंग सिद्धू यांनी मागील आठवड्यात हजेरी लावेली होती, यावेळी त्यांनी पाक लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली. यावरूनच आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमध्ये आज सडकून टीका केली आहे.

सिद्धूने शेण खाल्ले आहेच व त्याबद्दल त्यास जनतेनेच जाब विचारायला हवा. कधी शशी थरूर तर कधी मणिशंकर अय्यरसारखे लोक तोंडाच्या वाफा दवडतात व राहुल गांधींना अडचणीत आणतात. सिद्धू प्रकरणात तेच झाले. सुनील गावसकर, कपिलदेव यांनाही इम्रानचे खास आमंत्रण होतेच. या दोघांनीही इम्रानला नकार दिला, पण सिद्धू मात्र बेडकासारखा उडी मारत गेला. त्याच्या राष्ट्रभक्तीच्या ढोंगाचा फुगा त्यामुळे फुटल्याची टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन