fbpx

कर्नाटकातील कॉंग्रेस आघाडीचे अस्थिर सरकार टिकवण्यासाठी सिद्धारामय्यांचा मास्टरप्लॅन

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील कॉंग्रेस – जेडीएस आघाडीचे अस्थिर सरकार बळकट करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी एक खास मास्टरप्लॅन तयार केला आहे. हा मास्टरप्लॅन अमलात आला तर कर्नाटकात कॉंग्रेस आघाडी सरकारचा टिकावं लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धारामय्या यांनी आखलेल्या मास्टरप्लॅननुसार एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार डिसेंबर महिन्यांपर्यंत टिकल्यास काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येईल. त्याद्वारे बंडाचा सूर आळवणाऱ्या आमदारांना शांत करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागला. त्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार हे स्थापनेपासून अस्थिर असल्याने कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार धोक्यात येणार होते. मात्र आता सिद्धारामय्या यांनी सरकार टिकण्यासाठी शक्कल लढवली आहे.