fbpx

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारला सिद्धुची अनुपस्थिती

चंदीगढ – पंजाबमधील मोगामध्ये शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्यातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धु यांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु स्थानिक आमदार आणि पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या येण्याची कुठलीच माहिती त्यांना देण्यात आली नाही.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली होती की, पंजाब मधील चार शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्यातील चार मंत्री उपस्थित राहतील असे जाहीर क्र्ल्र होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नवज्योत सिंग सिद्धूंनी शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्कारला हजेरी लावली नाही. मोगाला जाण्याऐवजी ते लुधियानामध्ये एका कार्यक्रमास पोहोचले. या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. परंतु शहीद जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहता ते या कार्यक्रमाला आले.