Share

Siddhu Moosewala | प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकंडातील ‘हा’ आरोपी पहाटे फरार

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येने संपुर्ण देशात खळबळ उडवली होती. एवढंच नाही तर मुसेवालाचा आरोपी हा मोठा गुंड असून त्यांनी अनेक मोठ्या लोकांची कट रचली असल्याचं समोर आलं आहे. या आरोपींना अथक प्रयत्नांनंतर अटक करण्यात आलं होतं. अशातच आरोपी दीपक टिनू हा फरार झालं असल्याचं समोर आलं आहे. दीपक टीनू हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्यात गटातील गुंड आहे.

टीपक टीनू पोलिसांच्या ताब्यातून फरारः

मुसेवाला यांना मारण्यासाठी चार राज्यातील शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर पंजाबचे, 2 महाराष्ट्राचे, 2 हरियाणाचे आणि राजस्थानच्या एका शूटरला बोलावण्यात आले होते. दीपक टिनू हा मानसाच्या सीआयए पथकाच्या ताब्यातून फरार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दीपक टीनु गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड असल्याचं समोर आलं आहे. मानसा सीआयए पथक कपूरथळा जेलमधून चौकशीसाठी नेत असताना दीपकने पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन पळ काढला.

लॉरेन्स बिश्नोई हा तिहार जेलमध्ये आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान तो म्हणाला, यावेळी हे काम मी केलेलं नाही. कारण मी तुरुंगामध्ये आहे आणि मी फोनचा सुद्धा वापर करत नाही. पण मी हे मान्य करतो की सिद्धू मुसेवालाची हत्या माझ्याच टोळीतील लोकांनी केली आहे. मला त्याच्या मृत्यूची माहिती तिहार तुरुंगातील टिव्हीवर बातम्यांमध्ये पाहायला मिळाली.

नेमका कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. २०१८ मध्ये जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हापासून हा चर्चेत आलेला आहे. तो पंजाबच्या अबोहर भागात राहतो. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना निवडणुकीला उभा राहिला होता. पण निवडणुकीत पराभव झाल्यावर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याची गुन्हेगारी क्षेत्रात सुरवात झाली.

महत्वाच्य बातम्या :

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येने संपुर्ण देशात खळबळ उडवली होती. एवढंच नाही तर मुसेवालाचा आरोपी …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now