fbpx

सचिन कुंडलकारच्या ‘त्या’ पोस्टवर सिद्धार्थही भडकला…

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. त्यात विजयजींच्या चाहत्यांनी त्यांचा उल्लेख विजू मामा असा केला होता. पण, रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार तुमचा मामा-मावशी कशी काय लागते? अशा शब्दांत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी त्यावर टीका केली होती. त्या पोस्टवर अभिनेते जितेंद्र जोशी यांनी चांगलचं लांबलचक उत्तरही  दिलं आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ जाधवनेही सचिन कुंडलकरला ट्वीटद्वारे चांगलच फटकारलं आहे.