मुंबई : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांबरोबर आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगली ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता यावेळी सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यावरून चर्चेत आला आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती जाधव हिने सोशल मीडिया हँडेलवरून ‘जाधव’ हे नाव काढल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे ते घटस्पोट घेत आहेत का? अशी चर्चा चालू आहे. अखेर या चर्चांवर सिद्धार्थने मौन सोडले आहे. तो म्हणाला, ‘सब कुछ ठीक हैं’
एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ म्हणाला, “या सर्व अफवा कोठून पसरवल्या जातात काय माहित. आम्ही सोबत आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठीक आहे”. ते दोघे कौटुंबिक मतभेदामुळे वेगळे राहत आहेत. यावर प्रश्न विचारण्यात आला असता तो म्हणाला, ‘सब कुछ ठीक हैं’ सिद्धार्थने यापुढे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, या दोघांनी २००७ मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुली देखील आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या दोघांमधील प्रेम पाहून प्रेक्षकांनी त्याचं भरभरून कौतुकही केलं होतं. सिद्धार्थने त्याच्या हटके स्टाईलमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :