मुंबई : सिद्धार्थ जाधव हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांबरोबर आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगली ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता यावेळी सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यावरून चर्चेत आला आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती जाधव हिने सोशल मीडिया हँडेलवरून ‘जाधव’ हे नाव काढल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे ते घटस्पोट घेत आहेत का? अशी चर्चा चालू आहे.
माहितीनुसार, सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती गेल्या दोन वर्षापासून एकमेकांसोबत राहत नाहीत. काही कौटुंबिक मतभेदामुळे हे दोघे वेगळे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ त्याच्या दोन मुलींसोबत आणि पत्नीसोबत सुट्टीला फिरायला गेला होता. पण दोघांनीही एकमेकांसोबतचा एकही फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला नाही. त्यांनी फक्त मुलींसोबतचे फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केले. या दोघांचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर गेल्या दोन वर्षापासून दोघांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही. या सर्व चर्चांवर आत्तापर्यंत दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, या दोघांनी २००७ मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुली देखील आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या दोघांमधील प्रेम पाहून प्रेक्षकांनी त्याचं भरभरून कौतुकही केलं होतं. सिद्धार्थने त्याच्या हटके स्टाईलमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :