‘दलित’ व्यक्तीसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार : सिद्धरामय्या

टीम महाराष्ट्र देशा- दलित व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्यास मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडून देईल असे ट्विट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा मतदानानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेले असताना सिद्धरामय्या यांनी हे मोठे विधान केले. विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

मतदानानंतर समोर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांचा पक्ष जेडीएस किंगमेकर ठरणार आहे. काँग्रेसने त्रिशंकू परिस्थितीमध्ये जेडीएसची मदत घेण्यासाठी हे दलित कार्ड खेळलं असावं, अशीही चर्चा आहे.

Loading...