fbpx

कर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मध्ये भाजप सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली करत असताना आज काँग्रेस विधिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत नाराज आणि असंतुष्ट आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान, कर्नाटकात सत्तांतर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरुच आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देखील कर्नाटकातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेस-निजद आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्यांनी पक्षातील सर्व आमदारांना शुक्रवारी आयोजित काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. या आदेशामुळे नाराज काँग्रेस आमदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरम यांनी सांगितले की, काँग्रेस विधिमंडळाची बैठक सिद्धरामय्या यांनी बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला असंतुष्ट आमदार देखील उपस्थित राहणार आहेत.