Karnataka Election; काँग्रेसला मोठा धक्का सिद्धरामय्या यांचा पराभव

बेंगळुरू – कर्नाटक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर कॉंग्रेसची मात्र पीछेहाट झाली आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांचा चामुडेश्वरी मतदार संघातून पराभव झालाय. हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानण्यात येतोय.

दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु असल्याचं चित्र आहे. भाजपने बहुमताचा जादुई आकडा गाठल्यास जेडीएसचं किंगमेकर होण्याचं स्वप्न भंगणार आहे. भाजप ११३, कॉंग्रेस ६८ तर जेडीएस ४३ जागांवर सध्या आघाडीवर आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान भाजपनं काँग्रेसला मात देत आणखी एका राज्यामध्ये आपली सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

You might also like
Comments
Loading...