टीम महाराष्ट्र देशा : रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीविरोधात सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु आहे. तसेच पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन करणारे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. योगगुरु रामदेव बाबा यांनी टीव्हीवरील एका मुलाखतीत पेरियार, आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांबाबत वादग्रस्त विधान केल्याने मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
रामदेव बाबा यांच्या वादग्रस्त विधानानंतर शनिवारी #BycottPatanjaliProducts आणि त्यानंतर रविवारी सकाळपासून #ShutdownPatanjali हा हॅशटॅग ट्रेटिंगमध्ये आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही पटतात पण त्यांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी दलितांमध्ये भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवे.” असे विधान त्यांनी केले.
या वादग्रस्त विधानावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हंसराज वीणा या युजरने रामदेव बाबा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले, प्रिय रामदेव, तुम्ही अजून माफी मागितली नाहीत. आपलं एवढं धाडस? हे धाडस येत कुठून? सत्ता आणि सत्ताधाऱ्यांमुळेच ना?. पेरियार, आंबेडकर, मूलनिवासी अस्मिता यांवर वादग्रस्त टिपण्णी करणे तसेच आम्हाला वैचारिक दहशतवाद म्हणणे आम्ही सहन करणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
आमच्याकडे मेगाभरती नाही, मेरीटवर भरती होणार – जयंत पाटील https://t.co/pY3qdtFZbB via @Maha_Desha
— Maharashtra Desha (@Maha_Desha) November 17, 2019
शेतकऱ्यांना मदतीमुळे मिळेल दिलासा- पंकजा मुंडे https://t.co/YfJ7WtE9sM via @Maha_Desha
— Maharashtra Desha (@Maha_Desha) November 17, 2019