‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया 

‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया 

subhman gill

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) ने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जैमीसनचे (Kyle Jamieson) कौतुक केले आहे. तसेच त्याला इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग मिळू शकेल, अशी अपेक्षा नव्हती, असेही शुभमन गिल म्हणाला.

जेमिसनच्या चेंडूवर गिल 52 धावांवर बाद झाला. यावर बोलताना तो म्हणाला, ‘मला वाटते की त्याने पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. लंचनंतर त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. कधी कधी चेंडू रिव्हर्स स्विंग होईल हे कळणे अवघड असते आणि इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग सुरू होईल असे वाटले नव्हते.

‘कसोटी क्रिकेटमध्ये असेच होते. आपल्याला परिस्थितीचे त्वरित मूल्यांकन करावे लागेल. या डावात मला चेंडू त्या पद्धतीने ओळखता आला नाही. चेंडू असा रिव्हर्स स्विंग होईल अशी मला अपेक्षा नव्हती.’ असे तो म्हणाला आहे. तसेच शुभमन गिलने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या: