शुबमन गिलला लवकरच ‘त्या’ गोष्टी कराव्या लागतील दुरुस्त 

शुबमन गिलला लवकरच ‘त्या’ गोष्टी कराव्या लागतील दुरुस्त 

Shubman Gil

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल (Shubman Gill) ने पहिल्या सत्रात दमदार कामगिरी केली. त्याने चमकदार अर्धशतक झळकावले. मात्र, दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात काईल जेम्सनने इनस्विंग (Kyle Jamieson) चेंडूवर गिलला क्लीन आउट केले. गिलच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप अंतर होतं आणि चेंडू त्याच्या स्टंपवर आदळला.

गिलची एलबीडब्ल्यू किंवा बोल्ड होण्याची ही सहावी वेळ आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. उजव्या हाताचा फलंदाज अशाप्रकारे बाद होण्याबाबत दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याला त्याचा खेळ आणखी सुधरवण्याचा सल्ला देखील दिला आहे. दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘ही मानसिक गोष्ट नसून तांत्रिक दोष आहे. गिलने स्वत:ला क्रॉस शॉट्स खेळण्यापासून थांबवले पाहिजे. गिलने या तांत्रिक दोषावर मात केल्यास तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये यशस्वी होईल, असे कार्तिक म्हणाला आहे.

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सांगितले की युवा सलामीवीर शुभमन गिलच्या फलंदाजीत तांत्रिक समस्या आहेत. गिल क्रॉस शॉट्स खेळायला जातो आणि त्यामुळे त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये अनावश्यक अंतर असते. त्यामुळे तो अशाप्रकारे आऊट होतो.  शुभमनला या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. आणि त्याला सुधरवण्याची देखील गरज आहे. असा सल्ला दिनेश कार्तिक दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: