शुभांगीनी सांगळेला ‘क्वीन ऑफ ऑफ वेस्ट व अचीवर’चा किताब

टीम महाराष्ट्र देशा : शुभांगीनी सांगळे हिने मिसेस इंडिया २०१८ चा क्वीन ऑफ वेस्ट व अचीवर किताब मिळविला आहे. पुणे येथे चार दिवस झालेल्या स्पर्धेत विविध परिक्षांना समोरे जात अंतिम सोळा स्पर्धांकांतून शुभांगिनीची निवड करण्यात आली.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी संचालिका अंजना कार्ल मॅस्करीनस विनय अंरन्हा, विश्व सुंदरी युक्ता मुखी, अदिती गोवित्रीकर अभिनेते अमान वर्मा, सोनल चव्हाण प्रसिध्द गायिका शिवानी कक्षब उपस्थित होते. शुभांगिनी एमआयटीमधून अभियात्रिकीचे शिक्षण पुर्ण केले आहे. तर पुणे विद्यापीठातून पदव्वूतर शिक्षण प्राप्त केले आहे.