हिरकणी बाईक रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू

SHUBHAGGI PWAR

सातारा :  साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी सातारच्या ९ महिला हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुप माध्यमातून गेल्या असता नांदेड येथे अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या.

कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन या महिला तुळजापूर येथे पोहचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा येथील दाभड येथे टँकर सोबत शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाल्या.

ही यात्रा दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलो मीटर प्रवास करुन शुक्रवारी (ता १५) सातारा येथे तिची सांगता होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. दरम्यान, खासदार उदयनराजे भाेसले यांनी देखील शुभांगी पवार यांच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या