श्रुती बनली पुण्याची मैना; व्हिडीओ बघुन चाहते घायाळ

श्रुती मराठे

पुणे : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रुतीने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकताच तिने एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

श्रुती मराठे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, पुण्याची मैना..! गालावर नाही पण हनुवटीवर पडते खळी. या व्हिडीओत मला म्हणत्यात हो, म्हणत्यात पुण्याची मैना या गाण्यावर आपल्या अदा दाखवताना दिसते आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP