पुण्याच्या श्रुती-पल्लवी यांची ‘मिसेस युनिव्हर्स’वर छाप

misses universe

पुणे : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे नुकत्याच झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत पुण्यातील श्रुती पाटोळे-क्लॅरेन्स आणि पल्लवी कौशिक यांनी आपली छाप पाडली आहे. श्रुती पाटोळे यांनी ‘मिसेस युनिव्हर्स-कॉन्फिडन्ट’, तर पल्लवी कौशिक यांनी ‘मिसेस युनिव्हर्स-डिव्होटेड’ हा किताब जिंकला आहे. या दोघींचे यश भारतासाठी आणि पुण्यासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या ४० वर्षात या स्पर्धेसाठी पुण्यातून सहभागी होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. श्रुती पाटोळे ‘मिसेस युनिव्हर्स सेंट्रल एशिया २०१७’, तर पल्लवी कौशिक ‘मिसेस युनिव्हर्स नॉर्थ-सेंट्रल एशिया २०१७’ या टायटलसह मिसेस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत सहभागी झाल्या होत्या.

या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून परतल्यानंतर श्रेयस हॉटेलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्रुती आणि पल्लवी यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिवा पेजेंटच्या अंजना मास्कारेन्हास आणि कार्ल मास्कारेन्हास उपस्थित होते. मिसेस युनिव्हर्स लिमिटेडच्या वतीने २४ ऑगस्ट २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत डर्बन येथे ही स्पर्धा झाली. यामध्ये जगभरातील ७५ पेक्षा अधिक देशांतून ८४ स्पर्धक सहभागी झाले होते.

श्रुती यांनी यापूर्वी स्टार मिसेस पुणे २०१६, गॅलस फेस ऑफ द इअर महाराष्ट्र २०१७, मिसेस इंटेलिजन्ट महाराष्ट्र २०१६, मिसेस इंडिया इंटरनॅशनल ब्युटी विथ ब्रेन २०१७ आदी ‘किताब मिळवले आहेत. याबरोबरच श्रुती या उत्तम लेखिका असून, त्यांची अनेक पुस्तके वाचनीय ठरली आहेत. ‘७ अँथॉलॉजिज’ आणि ‘अ तुलीप इन द डेजर्ट’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Loading...

उच्च विद्याविभूषित असलेल्या पल्लवी यांनी एअरहोस्टेस म्हणूनही काम केले आहे. याआधी त्यांनी मिसेस पुणे अचिव्हर २०१६, मिसेस पुणे २०१७, मिसेस महाराष्ट्र २०१६, मिसेस इंडिया स्टाईल आयकॉन २०१६ आदी किताब जिंकलेले आहेत. पल्लवी या सॉफ़्ट्स्कील ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंटही आहेत.पुण्यातून सहभागी होऊन या स्पर्धेत ‘मिसेस युनिव्हर्स-कॉन्फिडन्ट’ हा उच्च किताब मिळाल्याबद्दल आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे श्रुती पाटोळे आणि पल्लवी यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यात खूप गोष्टी शिकता आल्या. अनेक सामाजिक उपक्रमही आम्ही तिथे पहिले. त्यातील काही आपल्याकडे राबविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत, असेही दोघीनी नमूद केले.

3 Comments

Click here to post a comment