हरिद्वार : हिंदी सिनेसृष्टीतील ‘नायक’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर याने मुख्य भूमिका या सिनेमात साकारली होती. वृत्तवाहिनेचा कॅमेरामन, मुलाखतकार, एक दिवसाचा मुख्यमंत्री ते जनतेचा विश्वास व काम करून कायम स्वरूपीचा जनतेसाठी बनलेला जनतेचा मुख्यमंत्री असं या सिनेमाचं कथानक आहे. याच सिनेमाशी मिळती जुळती घटना सत्यात घडत आहे.
आदर्श मुख्यमंत्री कसा असावा हे या सिनेमातून दर्शवण्यात आला होता. आता उत्तराखंडमध्ये ही घटना सत्यात उतरत आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला उत्तराखंडची एका दिवसाची मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. सृष्टी गोस्वामी या विद्यार्थिनीला एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळणार आहे.
सृष्टी गोस्वामी ही हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरची रहिवासी आहे. २४ जानेवारी रोजी सृष्टीला एक दिवसाची मुख्यमंत्री बनता येणार आहे. यामागे कारण देखील खास आहे. येत्या 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे. यानिमित्ताने मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी सृष्टी गोस्वामींची निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही मंजुरी दिली आहे. यात आणखी विशेष म्हणजे ती सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेला संबोधितही करणार आहे.
कसा असेल कार्यक्रम ?
सुरुवातीला सृष्टी राज्यातील विकास कार्याची समीक्षा करेल. त्यानंतर 12 विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांचे पाच-पाच मिनिटांसाठी सादरीकरण करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजपर्यंत विधानसभा भरणार असून विधानसभेला ती संबोधित करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री असताना आणखी एक व्यक्ती एक दिवसासाठी राज्याची मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
- ममतादीदींच्या अडचणी वाढल्या,जेष्ठ मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा
- ‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
- टीम इंडियानं सर्वांना ‘आत्मनिर्भर’तेचा धडा शिकवला : मोदी
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले