कोणी तरी सांगितले म्हणून अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नका; बारणेंंनी पार्थ पवारांना झापले

पुणे : शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही. तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली होती. त्याला बारणे यांनी आज (बुधवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.विरोधकांनी दत्तक घेतलेल्या गावात जाऊन अगोदर विकास पहावा, मगच बोलावे असे म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना झापले आहे.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आपण उरण तालुक्यातील खोपटे गाव दत्तक घेतले. त्यानंतर खोपटे गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. गावात रस्ते, लाईट, ड्रेनेज, मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, खासदार निधीतून बांधलेले बांधपाडा समाज मंदिर, प्राथमिक शाळेत संगणक, सर्व प्रकारचे शासकीय दाखले मिळत आहे असं बारणे यांनी म्हटले आहे.

प्राथमिक शाळेत संगणक, सर्व प्रकारचे शासकीय दाखले ऑनलाईन मिळत आहे. गाव 100 टक्केमध्ये हगणदारीमुक्त झाल्याचा दावा बारणे यांनी केला आहे. कोणी तरी सांगितले म्हणून अर्धवट माहितीच्या आधारे बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे विरोधकांनी माहिती घेऊन बोलावे, असा टोला देखील बारणे यांनी लगावला आहे.Loading…


Loading…

Loading...