श्रीराम मंदिर हा शिवसेनेसाठी राजकीय विषय नाही : एकनाथ शिंदे

eknath shinde

नागपूर : प्रभू श्रीरामचंद्र हा आमच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा  विषय आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर हा शिवसेनेसाठी राजकीय विषय नाही. शिवसेना या विषयावर कोणतेही राजकारण करू इच्छित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. दोन दिवसांच्या गडचिरोली दौर्यावर आले आहेत. नागपुरातून गडचिरोलीकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

श्रीराम मंदिराच्या विषयावर विश्व  हिंदू परिषद व भाजपकडून शिवसेनेला लक्ष करण्यात आले होते. यासंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना अयोध्येला जाऊन आले व मुख्यमंत्री झाल्यावरही अयोध्येला गेले होते. त्यामुळे कोण काय म्हणते, याला अर्थ नाही. सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यास आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे. ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.

गडचिरोलीत रस्ते नसल्यामुळे गरोदर महिलेला २५ किलोमीटर पायपीट करून रुग्णालयात जावे लागत आहे. अशा घटना पुढे आल्या आहेत. यासंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले, या भागात रस्त्याच्या विकासाची कामे सुरू केली जातील.

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

IMP