भारताचं सार्वभौमत्व संपवण्यासाठी आपलेच नागरिक प्रयत्न करत आहे : श्रीपाल सबनीस

shripal

पुणे:लोकशाहीमध्ये काम करत असताना पत्रकारांची लेखणी कधीच विभागलेली नसावी आणि विभागलेली लेखणी लोकशाहीसाठी घातक आहे त्यामुळे उजव्या व डाव्या अशा प्रकारचे भेदभाव न करता लेखन करावे असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार मराठी साहित्य संमेलनामधे बोलताना व्यक्त केले.तसेच पत्रकारांवर  वाढत्या हल्याबाबत केली चिंता व्यक्त

देशातील पहिलं राज्यस्तरीय पत्रकार मराठी साहित्य संमेलन आज महाराष्ट्रचे सांस्कृतिक शहर असलेले पुणे येथे पार पडत आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्त टिळक, संमेलनाध्यक्ष निखिल भातंबरेकर, स्वागतकक्ष कृषिमित्र गजेंद्र बडे, पुणे सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते असे.

काय म्हणाले श्रीपाल सबनीस?

मराठी भाषेला मोठी  संपादक व पत्रकारांची परंपरा लाभलेली आहे. सबंध देशात पत्रकारांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय आहे.  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. सबंध जगाच्या पाठीवर मागील काही वर्षांमध्ये जवळपास बाराशे पत्रकारांची हत्या झाली आहे. पत्रकारांची लेखनी कायम निर्भिड असली पाहिजे त्यामधे कधीच दुजाभाव असता कामा नये. पत्रकारांनी व्यवस्थेबद्दल किंवा एखाद्या राजकीय पक्षाबद्दल लिहिण हा त्याचा गुन्हा आहे का? भारताचं सार्वभौमत्व संपवण्यासाठी चीन किंवा पाकिस्तान नाही तर भारताचे नागरिक आपल्या मातीत जन्माला आलेले आपलेच नागरिक प्रयत्न करत आहे त्यामुळे आपल्याला धोका आपल्याच शत्रु पासून आहे.