‘सगळे ब्राम्हण-मराठा हे जातीयवादी नसतात,आंबेडकरी चळवळीचे नेते धर्मनिरपेक्ष असतातच असे नाही’

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला टोला

पुणे : लोकसभेसाठी २०१९ च्या निवडणूका जवळ आहे. कोणी मुस्लिमांशी गळाभेट करताहेत तर कोणी हिंदूशी. ज्याप्रमाणे प्रत्येक ब्राम्हण आणि मराठा हे जातीयवादी नसतात, त्याचप्रमाणे प्रत्येक आंबेडकरी चळवळीचे नेते हे धर्मनिरपेक्ष असतातच असे नाही, असा टोला माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. नुकतेच आंबेडकर यांनी एमआयएम या पक्षाशी युती केल्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. सबनीस यांनी हे वक्तव्य केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे देण्यात येणाऱ्या रमामाई पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार नगरसेविका लता राजगुरू यांना आंबेडकरी चळवळीचे नेते भीमराव आंबेडकर यांच़्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी डॉ. सबनीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘ जातीमुक्त भारत हेच बाबासाहेबांचं स्वप्न आहे. आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बाबासाहेबांच्या धर्मनिरपेक्षता तत्वाशी प्रामाणिक राहून काम करावे.’

पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले

‘सनातन’वरून लक्ष हटवण्यासाठीच नक्षलसमर्थकांवर कारवाई – प्रकाश आंबेडकर

You might also like
Comments
Loading...