शिवद्रोही छिंदम भाजप खासदार एकाच कार्यक्रमात, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

टीम महाराष्ट्र देशा : नारळी पौर्णिमेनिमित्तअहमदनगरमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांनी जाहीर उपस्थिती लावली. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे खासदार दिलीप गांधी हे सुद्धा उपस्थित होते. हे दोघे एकत्र आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.

शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमवर सरकारने कारवाई करावी – धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अनुद्गार काढल्यानंतर भाजपचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम याला घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. मात्र, रविवारी जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यामागे नक्की कोण आहे याचा उलगडाही शिवप्रेमींना झालाय यातुनच छिंदम याने पुन्हा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा असल्यामुळे वाद चिघळण्याची चिन्हे उपस्थित झाले आहेत.

शिवसेनेनं केला छिंदमच्या खुर्चीचा कडेलोट

नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांनी हजेरी लावली. तर याच कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी आणि त्यांचे पुत्र देखील उपस्थित होते. त्यामुळे आता छुप्या आवाजात सुरू असणारे खासदार दिलीप गांधी आणि श्रीपाद छिंदम यांच्या संबंधांची चर्चा उघडपणे करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार असं सांगण्यात आलं होतं मात्र, श्रीपाद छिंदम याने अचानक हजेरी लावून आपण महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहेे. यावरून अमदनगर मध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवरायांना अपशब्द: मनसेकडून छिंदमच्या पुतळ्याला फाशी

You might also like
Comments
Loading...