श्रीपाद छिंदमने केली पोलीस संरक्षणाची मागणी

अहमदनगर: भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याने नाशिक पोलीस प्रशासनाकडे न्यायालयातून सुटल्यानंतर आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

बडतर्फ श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

नगरच्या सबजेलमध्ये रवानगी केल्यावर तेथील कैद्यांनी छिंदम याला मारहाण व जोरदार घोषणाबाजी केली होती. न्यायालयातून सुटल्यानंतर आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याने नाशिक पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

You might also like
Comments
Loading...