श्रीपाद छिंदमला अटक, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?

श्रीपाद

नगर – दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर शिवद्रोही श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते ज्यामुळे त्यांना अटक होणं निश्चित झालं होतं. भगीरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि इतर 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान, अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.

महत्त्वाच्या बातम्या