वनगा म्हणजे कमळ हा लोकांचा समज ; बाबांचा फोटो वापरल्यानेच भाजपचा विजय – श्रीनिवास वनगा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, वनगा म्हणजे कमळ हा लोकांचा समज असल्याने आणि भाजपने बाबांचा फोटो वापरल्यानेच त्यांचा विजय झाल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी केला आहे. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघर पुन्हा जिकू असा विश्वास देखील श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला आहे. तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे लोकांना लवकरच कळेल अस मत सुद्धा वनगा यांनी व्यक्त केल आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांची चिरफाड केल्याचं पहायला मिळाल. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. तर शिवसेनेचे चिंतामण वणगा यांना लीड तोडण्यात अपयश आले आहे.

You might also like
Comments
Loading...