उदयनराजें विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा खास मोहरा मैदानात ?

टीम महाराष्ट्र देशा: सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम केला आहे. खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. यामध्ये उदयनराजे यांना खिंडीत पकडण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून सुरु आहे.

पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले पाटील यांचा साताऱ्यात चांगला जनसंपर्क आहे.

Loading...

राष्ट्रवादीच्या नेतृत्वार गंभीर आरोप करत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेत माझा पराभव होण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. मागील पंधरा वर्षे राष्ट्रवादीत अडवा व जिरवा धोरण चालायचे, माझ्याकडून गेलेल्या विकासकांमांच्या फाईली सरळ केराच्या टोपलीत टाकल्या जात, असा आरोप त्यांनी केला आहे.

तर उदयनराजेंची कोणती कामे अडवल्याचे माझ्या पाहण्यात नाही. त्यांची व्यक्तिगत कामे अडवली असतील तर मला माहीत नाही; आज मी बोललो तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी