अरविंद शिंदेंंचा २५ कोटीं तर भिमालेंचा थेट १०१ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

पुणे: गेल्या आठवड्यात महापालिका सभागृहात कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यामध्ये चांगलीच चाब्दिक बाचाबाची झाली होती, त्यानंतर शिंदे आणि भिमाले यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल केली. दरम्यान आता हा वाद आणखीन वाढणार असल्याच दिसत असून सोमवारी अरविंद शिंदे यांनी भिमाले यांच्यावर २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर, भिमाले यांनी देखील शिंदे यांच्यावर १०१ कोटींचा दावा दाखल केला आहे.

पालिकेतील अधिकारी किशोर पडळ हे सभागृह नेते भिमाले यांच्या कार्यालयात येत नसल्याने त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पडळ यांनी पाच मे रोजी याची तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली. यावरूनच भिमाले आणि शिंदे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरता वाद मिटला, मात्र. त्यानंतर दोघांनीही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल केली.

दरम्यान, सोमवारी अरविंद शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांच्या न्यायालयात भिमालेंच्या विरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तर श्रीनाथ भिमाले यांनी देखील अॅड प्रदीप गावडे यांच्यामार्फत १०१ कोटींच्या दाव्याची नोटीस शिंदे यांना पाठवली आहे.

You might also like
Comments
Loading...