fbpx

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ४० किलो सोन्याच्या अलंकारांनी सजला

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati of Pune

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपतीला 40 किलो सोन्याचे नवे अलंकार घडवण्यात आले आहे. यात मुकुटापासून सोवळ्यापर्यंतच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे.

आकर्षक आणि अत्यंत कलाकुसरीने तयार करण्यात आलेला मुकुट यंदा पहिल्यांदा बाप्पाला परिधान करण्‍यात येणार आहे. 7 विविध प्रकारचे मुकुट तयार करण्‍यात आले आहेत. मुकुटावर नवग्रहांचे रत्ने आहेत. तसेच 8 ते 10 हजार अमुल्य रत्नांनी मुकुट सजवण्यात आला आहे. मुकुटचे वजन 9.5 किलोग्रॅम आहे. 700 ग्रॅमचा रत्नजडित शुंडाहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे 2 किलोग्रॅमचे कान, 2.5 किलोचा अंगरखा बाप्पाला परिधान करण्यात येणार आहे.

पीएनजी ज्वेलर्सच्या 40 सूवर्णकारांनी 5 महिने परिश्रम घेऊन अलंकार तयार केले आहेत. यंदाच्या वर्षी श्री ब्रहमनस्पती मंदिर साकारण्यात येणार आहे. यानिमित्त त्रंबकेश्वर येथील गोरक्षनाथ मठाचे गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सदर मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‍घाटन 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.