fbpx

अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर लंकेच्या ७ बाद २६४ धावा

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित ५० षटकांत श्रीलंकेने ७ बाद २६४ धावा केल्या आहेत. टीम इंडियाला आता विजयासाठी २६५ धावांची गरज आहे.

श्रीलंकेकडून माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतकी खेळी केली त्याने ११३ धावा केल्या. तर थिरिमानेनेही अर्धशतक झळकावत ५३ धावांची खेळी केली. टीम इंडिया कडून जसप्रीत बूमराहने ३७ धावांत ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर, पांड्या, जडेजा आणि कुलदीप यादवने एक- एक गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज आहे. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्यावर ही जबाबदारी असेल. तसेच हा सामना जिंकण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांनाही जबाबदारीने खेळावे लागणार आहे.