मुंबई : आज बंडखोर आमदार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांचे पुतळे जाळून शिवसैनिक त्यांचा निषेध करत आहेत. यानंतर आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यानंतर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथील त्यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर श्रीकांत शिंदे यांच्यासह समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
यावेळी श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले कि, आज मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या बरोबर उभे राहण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात. ठाण्यासोबत बाहेरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले त्यासाठी त्यांना लोकांनी समर्थन दिले. आजही एकनाथ शिंदे हे आपण शिवसैनिक असल्याचेच म्हणत आहेत, असं श्रीकांत असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले कि, अडीच वर्षे अनैसर्गिक आघाडी झाली, त्यातून बाहेर पडलं पाहिजे. कार्यकर्त्यांची आज एकच तक्रार आहे. सत्ता आल्यावर त्यांचा विकास होईल असे त्यांना वाटत होते. मात्र त्यांची कामं झाली नाहीत. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी निधी थांबवण्याचं काम केलं. आज सत्तेत असून आमच्यावर अन्याय होत असेल तर काय फायदा अशा सत्तेचा? हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील मंजूर झालेल्या ठरावांवर भाष्य केलं आहे. आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच आहोत. उद्धव ठाकरे अजूनही आमचं ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे हे आमचे नेते म्हणून उद्धवसाहेबांनीच दिलेत. त्यांनी निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. तसेच आम्ही आमच्या गटाचं नाव हे वेगळं मागितलं नाही. मात्र आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्या असल्याने आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला गट स्थापन करू द्यावा, अन्यथा कोर्टात जाऊ, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<