डॉ. खासदार श्रीकांत शिंदे जपतायेत सामाजिक जाणिवा…

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : समाजाच्या जाणिवा, भावना बोथट होत चालल्या आहेतच आणि राजकारणी तर भावनाशून्य बनलेत असे गृहीतक आता जनमानसात रूढ होतंय. वेदना मोबाईलच्या कॅमेरात कैद करून त्या सोशल करणे इतकंच काय त्या सामाजिक जाणिवा अशी व्याख्या सध्या प्रचलीत झाली आहे. परंतु याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या कृतीतून छेद देताना दिसत आहेत.

मुसळधार पावसानं केरळमध्ये हाहा:कार माजला आहे. गेल्या १०० वर्षात झाला नाही. इतका मुसळधार पाऊस केरळात पडत असल्याने लाखो लोक बेघर झाले असून, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. केरळातील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदत पुरवण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून केरळमधल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार केरळ मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केरळातील नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी पुढे येत मदत करण्याचं आवाहनही केलं आहे.

केरळ मधील सामाजिक हातभारासोबतच किडनी प्रत्यारोपणासाठी पैसे नसलेल्या अहिरे कुटुंबाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षातून तातडीने ४ लक्ष रुपयांची मदत देऊन शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी चिमुकल्या ऋषिकेशच्या मदतीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देवासारखे धावून आले, असे अहिरे दाम्पत्य कबूल करत आहे. अनेक मुलांना शैक्षणिक दत्तक घेणे, मतदारसंघातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे असे कार्यक्रम डॉ. श्रीकांत शिंदे राबवत असतात.

आमदार नारायण पाटलांना धक्का, बंधू विलास पाटील शिंदे गटाच्या गळाला

नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट