खा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला चिरेबंदी

मुंबई / प्राजक्त झावरे-पाटील : लोकसभा निवडणूक जशी-जशी जवळ येऊ लागली आहे तश्या प्रत्येक मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. इच्छूक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम मतदारसंघात सुरू करत आहेत. गेली काही वर्षे निद्रिस्त झालेले सर्वच नव्याने या आखाड्यात दंड थोपटून आता उभे राहू लागले आहेत. अशाप्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कल्याण लोकसभा मतदारसंघातही गेली २-३ दिवस झडत आहेत.

सेना-भाजप सर्वच बाबतीत अपयशी असाल्याचा घणाघात मनसेचे राजू पाटील यांनी स्थानिक खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेना-भाजप वर टीका करून केला होता, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देखील लक्ष केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना फक्त पावसाळ्यात उगवणाऱ्या परजीवी छत्र्यांना कोण गांभीर्याने घेणारअसा जबरदस्त प्रतिटोला खासदारांनी मारला होता.

Loading...

मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात अतिशय मोठ्या फरकाने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या राजू पाटलांना अस्मान दाखविले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युती असल्याने डॉ.श्रीकांत यांना शिवसैनिकांच्या कष्टासोबतच लाटेचा देखील फायदा झाला होता. परंतु निवडून आल्यानंतर खासदारांनी जिंकलेला लोकांचा विश्वास, केलेली कामे ,राबवलेले उपक्रम यामुळें त्यांचा हा सुभा अजून मजबूत, भक्कम म्हणजेच चिरेबंदी झाल्याचा बोलले जात आहे.

एकीकडे मनसे नेते राजू पाटील जवळपास गेली ३-४ वर्ष विजनवासात असल्यासारखे अलिप्त होते, फक्त आपल्या पक्ष प्रमुखांच्या सभा सोडता इतरत्र त्यांची उपस्थित अभावानेच दिसून येत होती. त्यासोबतच स्थानिक भूमीपुत्रांच्या जमिनी बळकावून बिल्डरांच्या घशात ओतून आपले पोट फुगवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर सातत्याने होत आहे. मनसेच्या इंजिनाची मध्यंतरी भरकटलेली दिशा आणि त्यातून आलेली दयनीय अवस्था यातून कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय बाहेर पडणे केवळ अशक्यच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राजू पाटलांनी प्रथम समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिजे असं दबक्या आवाजात बोलले जात आहे..

याउलट खासदार डॉ. शिंदेनी नियोजनपूर्वक रस्ते, रेल्वे, अधिकच्या दळणवळण सुविधा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा , कला, क्रीडा अश्या सगळ्याच क्षेत्रात मतदारसंघात उत्तम काम केले आहे. शिळ-कल्याण रस्त्याचं सहा पदरी करण्याचं प्रत्यक्षात सुरू झालेले काम, कल्याण-मानपाडा-शिळ-तळोजा मेट्रो प्रकल्पाचा आराखड्याच अंतिम टप्प्यात आलेलं काम, कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाच पावसाळ्यानंतर सुरू होणार काम, मोटागाव-माणकोली खाडी पुलाच काम अशी मोठ्या परिघातील कामे तर सुरूच आहेत. त्या सोबतच सरकारी रुग्णालये देखील कात टाकत आहेत.

कळवा सरकारी रुग्णालयातील अत्याधुनिक मशीन, शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील सिटी स्कॅन , एमआरआय सारख्या अत्याधुनिक सेवांची सुरवात, डोंबिवलीतील सुतीकागृहाचा प्रस्तावित झालेला पुनर्विकास, उल्हासनगरच्या कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला पुनर्विकासासाठी केंद्राकडून मिळवून आणलेली मंजुरी, अंबरनाथच्या कै.डॉ. बी.जी. छाया रुग्णालयाचे अधिकच्या सोयींसाठीचे हस्तांतरण इ. आरोग्य व दळणवळणा संबंधीच्या योजना अल्पावधीत खासदारांनी राबविल्या आहेत..

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, ती नस ओळखून रेल्वेच्या संबंधी ठाणे ते दिवा रखडलेली सहावी मार्गिकेचे काम, दिवा-ठाकुर्ली स्थानकांच्या झालेला कायापालट, ठाकुर्ली टर्मिनन्सला मिळालेली मंजुरी, कल्याणचा यार्ड रेमॉडेलिंग प्रकल्प, अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरवात अशी रेल्वेच रुपडं पालटवणारी कामं झाली आहेत. त्यासोबतच ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाच पूर्ण झालेलं काम, खारेगाव रेल्वे उड्डाणपुलंच अंतिम टप्प्यात असणार काम, दिवा रेल्वे उड्डाणपुलाच पावसाळ्यानंतर सुरू होणार काम अश्या उड्डाणपुलांच्या मालिकेसोबतच रेल्वे स्थानकांवर झालेले नवीन पादचारी पूल, एस्क्लेटर्स, एलिव्हटर्स, एटीव्हीएम मशिन्स अशा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. दिवा स्थानकात वाढलेले लोकलचे थांबे, लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या, मतदारसंघातील प्रत्येक स्थानकात मिळणारे शुद्ध व थंड पाणी यांसारखी सगळी विकासकामे त्यांनी करून घेतली आहेत

दिवा उपनगरात होत असलेल्या विकासाच्या प्रकाशाने विरोधकांचे डोळे दिपत असल्याचे बोलले जाते. दिव्याला जोडणारे- होऊ घातलेले भले-मोठे रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत सुरू झालेल्या उपाययोजना, रेल्वेस्थानकाचा झालेला कायापालट, नागरिकांमध्ये निर्माण झालेली सुरक्षिततेची भावना हे सगळे सेनेचे काम आहे, असे नागरिक देखील बोलत आहेत. दिवा उपनगराचा होणारा कायापालट दृश्य असल्याने खासदारांना त्यांच्या कामाची पावती मिळेल असा व्होरा राजकीय वर्तुळात मांडला जात आहे.

२७ गावांबाबत निवडणुका जवळ आल्या की नेहमीच आवाज उठवला जातो. मागच्या वेळी इथून राजू पाटलांचे मोठे बंधू विधानसभेवर होते परंतु २०१४ च्या निवडणुकीत ही जागा सुभाष भोईर यांच्या रूपाने सेनेला मिळाली, त्यामुळे ही गावे नेहमीच कळीचा मुद्दा ठरत असतात. ही सर्व गावे खासदारांनी अंतर्गत रस्त्यांनी एकमेकांशी जोडली. या गावांच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी १८० कोटींची पाणी पुरवठा योजना अमृतमधून मंजूर करण्यासाठी देखील प्रयत्न केले. त्यामुळे इथल्या जनतेच्या विश्वासाला खासदार पात्र ठरल्याचे बोलले जाते.

मोदी सरकारने खासदार आदर्श गाव योजना आणली या योजनेतून ज्या मोजक्या खासदारांनी गाव बदलवण्याचा प्रयत्न केला त्यात खासदारांच्या ‘नागाव’ या गावचे नाव घ्यावे लागेल. आदर्श गावात महामार्गापासून गावापर्यंत गेल्या २५ वर्षात प्रथमच बारमाही टिकाऊ रस्ता त्यांनी तयार केला असून, सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेची नवी इमारत, अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल वर्गखोली देखील उभी केली आहे.

या खेरीच ‘पर्यावरणदूत’ अशी त्यांनी नवी ओळख लाखोंच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमातून निर्माण केली आहे. सांस्कृतिक , कला क्षेत्रातील त्यांनी चालू केलेले शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल , विविध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या सण-उत्सवांना दिलेली कलेची जोड, विविध खेळांच्या भरवलेल्या स्पर्धा, क्रीडांगणांचे केलेले पुनर्जीवन यातून या सुसंस्कृत मतदारसंघाला कलेची-खेळाची आवड असणारा खासदार मिळाल्याची भावना सर्वांमध्ये आहे.

थोडक्यात , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहनतीच्या व शिवसैनिकांच्या सहकार्याच्या जोरावर हा सुभा पुरता चिरेबंदी करून ठेवला आहे. याला सुरुंग लावणे जवळपास अशक्यप्रायच असल्याचे बोलले जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
जनतेतून थेट नगराध्यक्ष पद्धत बंद;आता ' अशी ' होणार निवड