Share

Shrikant Shinde | “आदित्य ठाकरेंच्या सभेला आम्ही कुठून लोकं आणायचो आम्हाला माहिती आहे”, श्रीकांत शिंदेंचा घणाघात

Shrikant Shinde | औरंगाबाद :  औरांगाबाद येथे काल आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा पार पडल्या. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचा डाव रंगला. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

आम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत सभेला जायचो. कुठून कुठून लोकं आणायचो आम्हाला माहिती आहे. काही लोकांना गच्चीवर, काही लोकांना बाजूला, काही लोक गर्दीत पाठवायचो. आदित्य ठाकरे यांनी भाषणात एखादा डायलॉग मारला की या लोकांना टाळ्या वाजवायला लावायचो. हे सगळं आम्ही त्यांच्यासाठी केले आहे. पण आज आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासाठी काम करणारी लोकं उरली नाहीत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टीका देखील शिंदेंनी केली आहे.

आमच्या सभेला परवानगी देत नसल्याचे सांगत काही लोकांनी प्रचंड गाजावाजा केला. त्यावर मी अब्दुल सत्तार यांना म्हणालो की, त्यांनी हव्या त्या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी द्या, एवढेच नव्हे तर त्यांना लागेल ते द्या. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, आपण त्यांना सगळं काही पुरवू पण लोकं कुठून आणणार? जाहीर सभा घेण्यासाठी आपल्यावर प्रेम करणारी माणसं लागतात. ती आदित्य ठाकरे कुठून आणणार होते, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या :

Shrikant Shinde | औरंगाबाद :  औरांगाबाद येथे काल आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा पार पडल्या. यावेळी दोन्ही गटांमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now