Shrikant Shinde | मुंबई : अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट देखील ही निवडणूक लढत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये राज यांनी भारतीय जनता पक्षानं पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांच्या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
राज ठाकरे यांच्या पत्राबाबत विचारले असता, त्यावर देवेंद्र फडणवीस आपले कार्यकर्ते, पदाधिकारी तसचं वरिष्ठ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मागाठणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्व येथे आमदार प्रकाश सुर्वे व विभागप्रमुख यांच्या शाखा क्रमांक 4 चा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास श्रीकांत शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
श्रीकांत शिंदे पुढे असंही म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे तसेच वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगीकृत करून चाललेल्या मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत.
दरम्यान, आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar । रमेश केरे यांनी मागील १० ते १५ दिवसांपूर्वी मला मेसेज केले; शरद पवारांचा मोठा खुलासा
- Raj Thackeray | “महाराष्ट्राची सत्ता हातात आली तर…”, राज ठाकरेंनी महाराजांची शपथ घेत सांगितला नवीन महाराष्ट्र
- Ramdas Athavle | “राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही, कारण…”; रामदास आठवलेंची राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया
- MNS | आरं ‘विंद’ सावंतांच्या थोबाडीत चपराक; पवारांच्या वक्तव्यानंतर मनसेचा टोला
- Sandipan Bhumare | संदीपान भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच लाईट गेली अन्… ; सरकारी रुग्णालयात गोंधळ