कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या, तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही – जगताप

blank

टीम महाराष्ट्र देशा : कुकडीच्या पाणी वाटप नियोजनात बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. आता ते म्हणतात, कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली. डिंबे, माणिकडोह, बोगदा मी मार्गी लावला. मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या. तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला.

कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप होते. जगताप पुढे म्हणाले, कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा ५०० रुपये जादा भाव दिला.

त्यामुळे केंद्र शासनाने कारखान्यास ३० टक्के कर भरावा, अशी नोटीस बजावली आहे. तरी कारखाना सभासदांची दिवाळी गोड करणार आहे. आघाडीचे सरकार असताना मी सयाजीराव होतो, असे पाचपुते यांनी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत म्हटले होते. मग त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया कशी जमविली. यावेळी सयाजीरावांनी सह्या फक्त स्वत:च्या विकासासाठी केल्या का? अशी टिकाही जगताप यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या