Share

Shri Krishna Idol stolen | तब्बल ३०० वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला

औरंगाबाद : गंगापूर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील मध्वनाथ महाराज समाधीसमोरील पुरातन दिव्य स्वरूप श्रीकृष्णाची पाषाणाची मूर्ती विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

श्री क्षेत्र शेंदुरवादा येथे 3०० वर्षांपूर्वीचा संत मध्वनाथ महाराज यांचा मठ आहे. या मठात संत मघ्वनाथ महाराज यांनी राधा-कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. ३५ वर्षापूर्वी येथील पाषाणाची राधेची मूर्ती चोरीला गेली. मात्र ही मूर्ती पुन्हा सापडली नाही. या पार्श्वभूमीवर येथील मठात भाविक दररोज श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येत होते.

गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या  सुमारास शेंदुरवादा येथील आनंदा निकम व इतर भाविक नित्याप्रमाणे दर्शनासाठी मठात आले. त्यांना मठातील मध्वनाथ महाराज समाधी स्थळाजवळील श्रीकृष्णाची पुरातन पाषाणाची दोन फुटी उंचीची मूर्ती चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामस्थांना माहिती झाल्यानंतर खळबळ उडाली, याबाबतची माहिती वाळूज पौलिसांना देण्यात आली. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील जांब येथील मंदिरातील पंचधातूची श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची मूर्ती २२ ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही, अशात श्रीक्षेत्र शेंदुरवादा येधील पुरातन मूर्ती चोरीस गेल्याने पुरातन मूर्ती चोरणारी एखादी टोळी कार्यरत आहे की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या :

औरंगाबाद : गंगापूर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील मध्वनाथ महाराज समाधीसमोरील पुरातन दिव्य स्वरूप श्रीकृष्णाची पाषाणाची मूर्ती विजयादशमीच्या …

पुढे वाचा

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now