औरंगाबाद : राज्यातील तसेच परराज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र शेगाव इथले गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने तसे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेगाव इथले श्री गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील गजानन महाराज मंदिर हे आज रात्रीपासूनच बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात पुढील आदेश येई पर्यंत हे मंदिर बंदच राहणार असल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. वास्तविक लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शेगाव इथली दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- जालनेकरांनो नियम पाळा; ९६ नवे बाधित रुग्ण, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
- परभणीत आढळले २१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू
- राज्यात २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू, तरी महाराष्ट्र बिनधास्त!
- ‘जनाबाई जाधवांच्या कविता या वेदनेतून उगवलेल्या’