श्रेयस अय्यरची सर्जरी यशस्वी ; फोटो शेयर करत म्हणाला…

श्रेयस अय्यर

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत खेळता आले नाही.  आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. त्याची सर्जरी यशस्वी रित्या पार पडली आहे. श्रेयसने रूग्णालयातील एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना स्वतःच्या प्रकृती विषयी माहिती दिली. सध्या त्याचा सर्जरी नंतरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

श्रेयसने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्याने मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. ‘सर्जरी यशस्वी झाली आहे. लवकरच सिंहा प्रमाणे आणि दृढ संकल्पसोबत मैदानावर परतण्यासाठी तयार आहे.’ असं श्रेयस ट्विट करत म्हणाला आहे. शिवाय त्याने लोकांनी दिलेल्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी आभार देखील मानले आहे.

आजपासूनआयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापुर्वीच काही संघाना काही धक्के बसले. त्यात दिल्ली कॅपीटलचा कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे आयपीएल मुकावे लागले. श्रेयश अय्यरच्या जागी रिषभ पंतवर दिल्ली कॅपिटल्सची धुरा सोपवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे स्वप्न’

सामन्यापूर्वी विराटाचे ट्विट ; मुंबई इंडियन्सला सावधगिरीचा इशारा

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी ; आजपासून रंगणार आयपीएलचा थरार

जालना – नांदेड समृद्धी जोडमहामार्गाच्या द्दष्टीने हालचाली सुरू : अशोक चव्हाण