दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यरची आणखी एका स्पर्धेतुन माघार

मुंबई : भारताचा आघाडीचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. काही दिवसापुर्वी त्याने सरावाला सुरुवात केली होती. मात्र अद्यापही दुखापतीतून पुर्णपणे सावरता न आल्यामुळे त्याने एका मोठ्या स्पर्धेतुन माघार घेतली आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी रॉयल लंडन कप स्पर्धेतुन श्रेयस अय्यरने माघार घेतली आहे. या स्पर्धेत तो लॅकशायर संघाकडून खेळत असतो. या संदर्भात बोलताना अय्यर म्हणाला,’यदांच्या मोसमात मला लॅकशायरकडून खेळता येणार नाही. मात्र भविष्यात या क्लबकडून खेळण्याची संधी नक्की मिळेल.’ अशी आशा त्याने व्यक्त केली. लॅकशायर संघाचे डायरेक्टर यांनी देखील त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत तो लवकर ठीक व्हावा अशी शुभेच्छा दिली.

यादरम्यान श्रेयस अय्यर आगामी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामात खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाल्यानंतर अय्यरने आयपीएलच्या २०२१ स्पर्धेतुन माघार घेतली होती. अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले होते. कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाली तेव्हा दिल्लीचा संघ गुणतालीकेत अव्वलस्थानी होता. त्यामुळे उर्वरीत स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP