टॉस जिंकून रहाणेने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय; श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण

टॉस जिंकून रहाणेने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय; श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण

sreyash iyar

कानपूर : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु झाली असून पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होत आहे. आजपासून मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane)नेतृत्वाखाली भारताचा (India)न्यूझीलंडविरुद्ध (New-Zealand) पहिला कसोटी सामना होणार आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma)नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळविला आहे. त्यामुळे आता रहाणेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रहाणेने संघात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असल्याचे सांगितले आहे. या सामन्यातून श्रेयस अय्यर कसोटी पदार्पण करत आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी अय्यरला कसोटी कॅप दिली आहे.

विराट कोहलीच्या (virat kohali)अनुपस्थितीत हा पहिला कसोटी सामना आज होणार आहे. अजिंक्य रहाणेसाठी गुरुवारपासून सुरू होणारा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना कौशल्याची दुहेरी कसोटी पाहणारा ठरणार आहे. भारताचे यशस्वी नेतृत्व करण्याबरोबरच फलंदाजीतही छाप पाडण्यास रहाणे उत्सुक आहे.

भारतीय संघ :

शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव.

महत्वाच्या बातम्या