पदार्पणात श्रेयस अय्यरने केला ‘हा’ रिकॉर्ड; ठरला १६ वा भारतीय खेळाडू

पदार्पणात श्रेयस अय्यरने केला ‘हा’ रिकॉर्ड; ठरला १६ वा भारतीय खेळाडू

Shreyas Iyer

कानपूर : युवा फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ही कामगिरी केली.

श्रेयस अय्यरने कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. मधल्या फळीत श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आणि सुरुवातीला थोडा वेळ घेतल्यानंतर त्याने वेगवान फलंदाजी केली.

खेळाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात त्याने आपले शतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरने 157 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले आणि यासह पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला.

या शतकामुळे श्रेयस अय्यरने अनेक मोठे विक्रम केले. न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यासोबतच पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. पदार्पणातील हे चौथे वेगवान शतक आहे. श्रेयस अय्यरच्या आधी पृथ्वी शॉने हा पराक्रम केला होता.

महत्वाच्या बातम्या: