भारत अ संघाचा त्रिकोणीय मालिकेवर कब्जा

shreyas

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या त्रिकोणीय मालिकेवर भारतीय अ संघाने आज दणदणीत विजय मिळवत कब्जा केला.  भारत अ व दक्षिण आफ्रिका अ यांच्यात प्रिटोरिया येथे  आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताने आफ्रिका अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला.आफ्रिका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 विकेटच्या बदल्यात 267 धावा केल्या.भारतातर्फे यस एन ठाकुरने 3 तर सिद्धार्थ कौल याने 2 खेळाडू बाद केले.भारताच्या डावची सुरवात अत्यंत खराब झाली.सलामीला आलेले संजू सॅमसन व करूण नायर लवकर बाद झाले.त्यानंतर श्रेयस अय्यर व विजय शंकर यांनी डाव सावरला.विजय शंकर 72 धावा काढून बाद झाला.त्यानंतर कर्णधार मनीष पांडे व अय्यर यांनी भारताला 46.5 षटकात सहज विजय मिळवून दिला.श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले.श्रेयस अय्यर 140 धावा काढून नाबाद राहिला.श्रेयस अय्यरला सामनावीर तर मनीष पांडेला मालिकवीर हा किताब देण्यात आला.आगामी श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी पांडे व अय्यर या दोघांनीही आपली दावेदारी पक्की केली .