श्रद्धा कपूरला फरफटत नेले घरी

मुंबई – फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रेम कहाणीच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉक ऑन २ सिनेमाच्या निमित्ताने फरहान आणि श्रद्धा हे एकत्र आले आणि त्यानंतर एकमेकांना डेट करणं सुरु झालं. फरहान अख्तरचं लग्न झालेलं असुन त्याला दोन मुलंही आहेत. मात्र, अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जवळीक वाढल्यानंतर फरहान त्याच्या पत्नी पासुन दूर झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या दोघांनी काही दिवसांपूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार केला. यानंतर श्रद्धा कपूरने आपले वडील शक्ती कपूर यांच जुहू येथील घरं सोडून फरहानसोबत राहण्यास गेली.

फरहान राहत असलेल्या घराच्या दरवाजाची रविवारी जेव्हा बेल वाजली आणि श्रद्धाने दरवाजा उघडला. शक्ती कपूर आणि मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांना पाहून श्रद्धाला धक्का बसला. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असणा-या फरहानसोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध शक्ती कपूर यांना मान्य नव्हते. यामुळेच शक्ती कपूर हे श्रद्धाला घरी नेण्यासाठी आले होते. श्रद्धा सहजासहजी घरी जाण्यास तयार नव्हती. अखेर शक्ती कपूर यांनी तिला फरफटत घरी नेले.

You might also like
Comments
Loading...