नागपूरच्या महापौरांचा प्रताप, मुलाला पीए बनवून नेलं अमेरिकेच्या दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा – नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी स्वत:च्या मुलाला खासगी सचिव (पीए) बनवून परदेश दौऱ्यावर नेल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आल्यानंतर नागपूर शहर भाजपनेही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलीय.

महापौर नंदा जिचकार या सध्या अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्को इथं पर्यावरण आणि ऊर्जे संदर्भातल्या जागतिक महापौर परिषदेला गेल्या आहेत. परिषद आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या अॅम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे. महापौरांचा प्रताप उघडकीस येताच नागपुरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, महापौर नंदा जिचकार यांनी स्पष्टीकरण देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा हा माझं सोशल मीडिया अकाऊंट हाताळतो त्यामुळे मी त्याला सोबत नेलं असं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं आहे.

बेरोजगारीने निराश झालेल्या तरुणांकडून होतात बलात्कार ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे

भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला- संघाच स्पष्टीकरण

Comments
Loading...