लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

ठाणे : जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केल्याची घटना कल्याणामध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने गणेश कराडकर या तरुणाविरुद्ध खडकपाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. कुर्ल्यामध्ये राहणारी पीडित तरुणीचे कल्याणमधील योगीधाम परिसरात राहणारा गणेश बळीराम कराडकरशी प्रेमसंबंध होते. याच गोष्टीचा फायदा घेत, गणेशने पीडित तरुणीला 13 जुलै रोजी त्याच्या कल्याणातील राहत्या घरी बोलावून घेतले. यावेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading...