‘आ.गिरीश महाजन दाखवा, दहा लाख मिळवा’, राष्ट्रवादीचे आवाहन

girish mahajan

जळगाव : जामनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा गंभीर परिस्थितीतही तालुक्याचे आमदार गिरीश महाजन पश्चिम बंगालच्या निवडणूकीत रंगलेत. आमदारांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फलक झळकावून निषेध केला. तर ‘आमदार दाखवा अन् १० लाख मिळवा’, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीच्या किशोर पाटील यांनी केले.

जामनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा संकटसमयी रुग्णांना लोकप्रतिनिधी म्हणून आधार देण्याचे व प्रशासनाशी संवाद साधून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सोईसुविधा पुरविणे गरजेचे आहे. पण आमदार गिरीश महाजन मात्र पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात दंग आहेत. प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या मतदार संघातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी झटत आहेत.

कोरोनामुळे तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे, अडचणीत सापडली असून खऱ्या अर्थाने त्यांना आधाराची गरज आहे. तुम्हाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा पक्ष महत्वाचा आहे. गेल्या २५ वर्षापासून महाजन यांना पश्चिम बंगालच्या नव्हे तर जामनेर तालुक्यातील मतदारांनी मतदान केले आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पळ काढता आहात, असे आरोप या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले.  याप्रसंगी ‘आमदार साहेब गेले तरी कुठे’, आमदार दाखवा, १० लाख मिळवा’ अशा आशयाचे फलक दाखवून पालिका चौकात आंदोलन केले.

महत्वाच्या बातम्या

IMP